भावनिक क्षण , मी आणि ऋग्वेद
काल 16 ऑक्टोबर 2024 होती. मी तीन दिवसांपासून पुण्यात कामासाठी होतो, आणि यावेळी घरी असताना ऋग्वेदचा खेळ, गोष्टी आणि आमचे वेळ एकत्र घालवणे खूप आठवले. आम्ही दोघं इतके वेळा खेळतो की, रात्री एक-दीड वाजता झोपायची वेळ टळते. झोपायच्या आधी मी ऋग्वेदला नेहमी गोष्ट सांगतो, त्याच्या स्पायडरमॅनच्या कथा तयार करतो, आणि दिवस कसा जातो ते कळतही नाही. अशा वेळी, पुण्यात अचानक कामासाठी जायला लागल्यावर ऋग्वेदचं मन खूप भरून येतं. साडेचार वर्षाचं बाळ, त्याला माझं निघणं अजिबात आवडत नाही. काल रात्री साडेदहा वाजता सागरचा फोन आला, आणि ऋग्वेद बोलायला लागला. पहिलाच प्रश्न, "पप्पा, तुम्ही कुठे आहात?" मी उत्तर दिलं, "बाळ, मी पुण्याला आहे." पुढे तो विचारला, "पप्पा, तुम्ही उद्या येणार?" मला अगदी भरून आलं. तो स्पायडर आणि मंकीची काही गोष्ट सांगत होता, आणि मी त्याला एक गोष्ट तयार करून ऐकवली. ऐकून झाल्यावर विचारलं, "गोष्ट आवडली का?" त्याने आनंदाने उत्तर दिलं, "हो, आवडली!" मग तो विचारायला लागला, "पप्पा, माझं हेलिकॉप्टरचं खेळणं घेतलं का?" खरं तर, ते विकत घ्यायचं राह...