भावनिक क्षण , मी आणि ऋग्वेद
काल 16 ऑक्टोबर 2024 होती. मी तीन दिवसांपासून पुण्यात कामासाठी होतो, आणि यावेळी घरी असताना ऋग्वेदचा खेळ, गोष्टी आणि आमचे वेळ एकत्र घालवणे खूप आठवले. आम्ही दोघं इतके वेळा खेळतो की, रात्री एक-दीड वाजता झोपायची वेळ टळते. झोपायच्या आधी मी ऋग्वेदला नेहमी गोष्ट सांगतो, त्याच्या स्पायडरमॅनच्या कथा तयार करतो, आणि दिवस कसा जातो ते कळतही नाही.
अशा वेळी, पुण्यात अचानक कामासाठी जायला लागल्यावर ऋग्वेदचं मन खूप भरून येतं. साडेचार वर्षाचं बाळ, त्याला माझं निघणं अजिबात आवडत नाही. काल रात्री साडेदहा वाजता सागरचा फोन आला, आणि ऋग्वेद बोलायला लागला. पहिलाच प्रश्न, "पप्पा, तुम्ही कुठे आहात?" मी उत्तर दिलं, "बाळ, मी पुण्याला आहे." पुढे तो विचारला, "पप्पा, तुम्ही उद्या येणार?" मला अगदी भरून आलं.
तो स्पायडर आणि मंकीची काही गोष्ट सांगत होता, आणि मी त्याला एक गोष्ट तयार करून ऐकवली. ऐकून झाल्यावर विचारलं, "गोष्ट आवडली का?" त्याने आनंदाने उत्तर दिलं, "हो, आवडली!" मग तो विचारायला लागला, "पप्पा, माझं हेलिकॉप्टरचं खेळणं घेतलं का?" खरं तर, ते विकत घ्यायचं राहिलं होतं, पण त्याला आनंद मिळावा म्हणून म्हटलं, "हो, घेतलं." त्याने लगेच विचारलं, "कुठल्या रंगाचं?" मी म्हटलं, "येल्लो." मग त्याने फटाक्यांचा विषय काढला, "पप्पा, तुम्ही आलात की फटाके घ्यायला जाऊया ना?" मी म्हटलं, "हो, जाऊया!"
त्याचं बोलणं, त्याचा निरागसपणा, आणि शेवटी त्याचं "आय लव यू, पप्पा" ऐकून माझं मन अगदी भरून आलं. त्या क्षणी मी ठरवलं, आता असा जॉब करायचाच नाही की ज्यामुळे ऋग्वेदपासून दूर रहावं लागेल. मी माझा व्यवसाय असा सेट करणार आहे की, ऋग्वेदचं बालपण मी पूर्णपणे एन्जॉय करू शकेन, त्याच्यासोबत खेळू शकेन, वेळ घालवू शकेन. त्याचबरोबर मी ठरवलं की माझा व्यवसाय इतका यशस्वी करायचा की ऋग्वेदला मी एक सुदृढ आणि यशस्वी उद्योजक म्हणून घडवू शकेन.
आय लव यू, ऋग्वेद.
Comments
Post a Comment